तिसगाव, ता. चांदवड, जि. नाशिक, ४२३१०१
info@shodhorganicfarming.com
भारत कृषीप्रधान देश आहे. या देशामध्ये शेतीला अतिशय महत्त्व आहे. परंतु ही शेती मात्र शाश्वत पद्धतीने ,सेंद्रिय पद्धतीने केली जात नाही. पारंपारिक पद्धतींमध्ये सेंद्रिय तत्त्वांचा अभाव असतो. यामुळे पर्यावरणाचे नुकसान आणि उत्पादनाच्या गुणवत्तेतही कमी येते. "शोध" या संघाच्या उद्देश हा आहे की, शाश्वत सेंद्रिय शेतीची पद्धत अधिकाधिक शेतकऱ्यांमध्ये प्रचलित केली जावी. आपल्या पद्धतीद्वारे आम्ही शेतकऱ्यांना सेंद्रिय फळे, भाज्या, धान्ये आणि इतर कृषी उत्पादनांची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता वाढवण्याचे प्रेरणादायक मार्गदर्शन करत आहोत. श्री. साई माऊली शाश्वत सेंद्रिय शेती अंतर्गत शोध या प्रणालीमध्ये आपण शाश्वत सेंद्रिय शेती करत आहोत आणि शेतकऱ्यांना या संदर्भात संपूर्ण फळ लागवडीपासून ते फळ विक्री पर्यंत मार्गदर्शन करत आहोत. "शोध" आपल्या प्रणालीद्वारे सेंद्रिय शेतीसाठी एक नवा आयाम उभारते. आमच्या तज्ञांच्या सहाय्याने, शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतींची माहिती देऊन त्यांच्या उत्पादनात सुधारणा करणे आणि पर्यावरणासाठी लाभदायक ठरणाऱ्या पद्धतींना प्रोत्साहन देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. अशा प्रकारे, "शोध" आपल्या शेतकऱ्यांना केवळ उत्पादनाच्या दृष्टीनेच नव्हे तर पर्यावरणीय दृष्टीनेही सक्षम करत आहे.
Ensuring premium standards in every product we trade.
Connecting local farmers with global markets efficiently.
भारतामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने पैशाची शेती किंवा सेंद्रिय शेती करणे आवश्यक आहे. सेंद्रिय शेतीने केवळ पर्यावरणाचे रक्षण होतेच, पण त्यातून दीर्घकालीन आर्थिक फायदे देखील मिळू शकतात. यासाठी, आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना विविध मार्गदर्शक तत्त्वे आणि तंत्रज्ञान प्रदान करतो, ज्यामुळे त्यांना त्यांच्या शेतीच्या पद्धती सुधारता येतात आणि उत्पादनात वाढ करता येते. शेतकऱ्यांना शेती कशी करावी हे समजून घेण्यासाठी, आम्ही त्यांना आवश्यक असलेली माहिती आणि साधने पुरवतो. उत्पन्न वाढवण्यासाठी, आम्ही त्यांना बाजारातील मागणीवर आधारित पिकांची निवड कशी करावी आणि त्यानुसार पुरवठा कसा व्यवस्थापित करावा हे शिकवतो. कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न प्राप्त करण्यासाठी कोणती पद्धती लागू कराव्यात हे देखील स्पष्ट करतो. फळ लागवडीतून ते फळ विक्रीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेतील मार्गदर्शन करून, शेतकऱ्यांना त्यांच्या व्यवसायाची क्षमता वाढवण्यात मदत करतो.
अपेडा (APEDA) ने निर्यातक्षम फळांच्या नोंदणी प्रणालीमध्ये पेरू, अंजीर आणि सिताफळांचा समावेश केला आहे. या संदर्भात अपेडा (APEDA) ने “फ्रूटनेट” नावाची प्रणाली विकसित केली आहे, ज्याद्वारे निर्यातक्षम फळांच्या बागांची नोंदणी करता येईल. हे वृत्त सकाळ वृत्तसेवेचे प्रसिद्ध कृषी दैनिक “ॲग्रोवन” ने प्रकाशित केले आहे.
आपल्या शेतीतील उत्पन्न वाढवण्यासाठी, आमच्या अनुभवाचा आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेणे आवश्यक आहे. एका एकरात सहा एकरासमान उत्पादन कसे साधता येईल, हे आम्ही आपल्याला दाखवू शकतो. आम्ही आपल्याला जमिनीच्या विश्लेषणानुसार, खतांचे आणि औषधांचे योग्य वापर करून पाणी आणि संसाधनांची बचत करण्याच्या पद्धती सांगतो. यामुळे, आपण आपल्या शेतीतील खर्च कमी करून अधिकतम उत्पन्न मिळवू शकता.
आज शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने शेती करत आहे परंतु श्री साई माऊली शाश्वत सेंद्रिय शेती यांनी मात्र मियावाकी फॉरेस्ट टेक्नॉलॉजी या जापनीज शेती तज्ञाच्या म्हणण्यानुसार जर जंगल प्रचंड वाढू शकतात, तर आपण फ्रुट फॉरेस्ट टेक्नॉलॉजी का करू शकत नाही? त्यानुसार आम्ही मजल्याची शेती, मिश्र फळ शेती एका एकर मध्ये सात एकर ची शेती, खत, पाणी, औषध, मजुरी ही एकाच एकरची परंतु उत्पादन मात्र पाच ते सात एकर पर्यंत, आमच्या शेतात सुरू केलेली आहे. देशी / विदेशी वेगवेगळ्या वाण आम्ही स्वतः आर एन डी / एम डी (संशोधन) करून त्यांची लागवड, अति घनदाट केलेली आहे, जसे आम्ही नऊ बाय दोन फूट, सहा बाय दोन फुटावर पेरूच्या झाडांची लागवड एका क्षेत्रामध्ये करून, एका एकर मध्ये तीन एकरची फळ शेती एवढेच नाही तर सहा एकरची फळ शेती केली आहे.त्याच्याच मध्ये आंबा, फणस, काजू, मोहगणी, नारळ याचबरोबर विविध फळझाडांची लागवड केली. बांधावरची शेती,मिश्र फळबाग, मजल्याची शेती, ऑक्सिजन प्लांट, ऍग्रो टुरिझम असे आमच्या शेतांचे प्रमुख उद्दिष्टे आहेत.
आमचा सिद्धांतच आहे की मागणी तसा पुरवठा म्हणजेच शेतकऱ्याला शंभर टक्के शाश्वत सेंद्रिय उत्पादन काढून देणे.
“शोध” संघाच्या दृष्टीकोन म्हणजे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीच्या मार्गावर प्रोत्साहित करणे, त्यांना प्रेरणा देणे आणि मार्गदर्शन प्रदान करणे. आम्ही तंत्रज्ञान, ज्ञान आणि संसाधनांच्या सहाय्याने शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक आणि टिकाऊ कृषी पद्धतींचा अवलंब करून अधिक उत्पादनक्षम, स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे लक्ष्य ठेवतो. आमचा विश्वास आहे की सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून, आपण एक हरित आणि समृद्ध भविष्य निर्माण करू शकतो, जे आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि समाजासाठी लाभकारी ठरेल.
शोध संघाचे ध्येय म्हणजे भारतातील प्रत्येक शेतकऱ्याला शंभर टक्के सेंद्रिय आणि शाश्वत शेतीकडे वळवणे. यासाठी, आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना मागणी आणि पुरवठ्यानुसार सुसंगत पद्धतीने पैशाची शेती कशी करावी याचे मार्गदर्शन करण्याचा प्रयास करतो. शेतकऱ्यांना पारंपारिक शेतीच्या पद्धतीतून बाहेर पडून आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत पद्धतींचा वापर करण्यास प्रेरित करण्यासाठी, आम्ही त्यांना प्रत्यक्ष, ऑनलाइन, आणि आधुनिक पद्धतीद्वारे वेळोवेळी मार्गदर्शन करतो. हे मार्गदर्शन शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनात सुधारणा करण्यास, अधिक उत्पन्न मिळवण्यास आणि पर्यावरणाच्या दृष्टीने टिकाऊ शेती करण्यास मदत करते. “शोध” चा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचे ज्ञान वाढवणे आणि त्यांना सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रात यशस्वी बनवणे.
आम्ही एक प्रतिष्ठित सेंद्रिय शेती विकास संघ आहोत, ज्याचा उद्देश शाश्वत व नैसर्गिक पद्धतीने शेतीचे संवर्धन करणे हा आहे. आमचे ध्येय आहे की शेतीमधून उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना शाश्वत व निसर्गस्नेही पर्याय पुरवणे. पर्यावरणाचा सन्मान राखत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही सेंद्रिय शेती क्षेत्रात नवचेतना निर्माण करत आहोत.
श्री साई माऊली शाश्वत सेंद्रिय शेती मध्ये आम्ही फक्त शेती करत नाही तर शेतीच्या माध्यमातून समाजाचा विकास आणि पर्यावरणाचे संरक्षण यावर लक्ष केंद्रित करतो. आम्ही अभिमानाने सांगू शकतो की आम्ही शेतकरी आणि ग्राहकांच्या विश्वासार्हता मिळविण्यासाठी निरंतर प्रयत्नशील आहोत.
Automated page speed optimizations for fast site performance