भारत कृषीप्रधान देश आहे. या देशामध्ये शेतीला अतिशय महत्त्व आहे. परंतु ही शेती मात्र शाश्वत पद्धतीने ,सेंद्रिय पद्धतीने केली जात नाही.
पारंपारिक पद्धतींमध्ये सेंद्रिय तत्त्वांचा अभाव असतो. यामुळे पर्यावरणाचे नुकसान आणि उत्पादनाच्या गुणवत्तेतही कमी येते. "शोध" या संघाच्या उद्देश हा आहे की, शाश्वत सेंद्रिय शेतीची पद्धत अधिकाधिक शेतकऱ्यांमध्ये प्रचलित केली जावी. आपल्या पद्धतीद्वारे आम्ही शेतकऱ्यांना सेंद्रिय फळे, भाज्या, धान्ये आणि इतर कृषी उत्पादनांची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता वाढवण्याचे प्रेरणादायक मार्गदर्शन करत आहोत.
श्री. साई माऊली शाश्वत सेंद्रिय शेती अंतर्गत शोध या प्रणालीमध्ये आपण शाश्वत सेंद्रिय शेती करत आहोत आणि शेतकऱ्यांना या संदर्भात संपूर्ण फळ लागवडीपासून ते फळ विक्री पर्यंत मार्गदर्शन करत आहोत.
"शोध" आपल्या प्रणालीद्वारे सेंद्रिय शेतीसाठी एक नवा आयाम उभारते. आमच्या तज्ञांच्या सहाय्याने, शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतींची माहिती देऊन त्यांच्या उत्पादनात सुधारणा करणे आणि पर्यावरणासाठी लाभदायक ठरणाऱ्या पद्धतींना प्रोत्साहन देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. अशा प्रकारे, "शोध" आपल्या शेतकऱ्यांना केवळ उत्पादनाच्या दृष्टीनेच नव्हे तर पर्यावरणीय दृष्टीनेही सक्षम करत आहे.
25
M
Growth Tonns of Harvest
100% Guaranteed Organic Product
Always parties but trying she shewing of moment.
Top-Quality Healthy Foods Production
Majority have suffered alteration in some form by injected humor.
आमची प्रेरणा
श्री साई माऊली शाश्वत सेंद्रिय शेती
आम्ही एक प्रतिष्ठित सेंद्रिय शेती विकास संघ आहोत, ज्याचा उद्देश शाश्वत व नैसर्गिक पद्धतीने शेतीचे संवर्धन करणे हा आहे. आमचे ध्येय आहे की शेतीमधून उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना शाश्वत व निसर्गस्नेही पर्याय पुरवणे. पर्यावरणाचा सन्मान राखत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही सेंद्रिय शेती क्षेत्रात नवचेतना निर्माण करत आहोत.
आमची प्रमुख वैशिष्ट्ये:
शाश्वत आणि नैसर्गिक शेतीचे प्रमाणीकरण
पारंपारिक व आधुनिक शेती पद्धतींचा समतोल
शेतकऱ्यांना मार्गदर्शन व शिक्षण
पर्यावरणास अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब
श्री साई माऊली शाश्वत सेंद्रिय शेती मध्ये आम्ही फक्त शेती करत नाही तर शेतीच्या माध्यमातून समाजाचा विकास आणि पर्यावरणाचे संरक्षण यावर लक्ष केंद्रित करतो. आम्ही अभिमानाने सांगू शकतो की आम्ही शेतकरी आणि ग्राहकांच्या विश्वासार्हता मिळविण्यासाठी निरंतर प्रयत्नशील आहोत.